Ad will apear here
Next
बर्ड नेस्ट
बर्ड नेस्ट

पनीर व चीज या दोन्ही गोष्टी मुलांच्या आवडीच्या आहेत. परंतु या दोन्ही गोष्टी नेहमी आपण एखादा पदार्थ पूर्ण करण्यासाठी म्हणून वापरतो. यांमध्ये काहीही न घालता त्यांच्या चवीचा आनंद मुलांना घेऊ दिला तर..? यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत एक अनोखा पदार्थ, बर्ड नेस्ट...
................... 

मुलांचा डबा पौष्टिक पदार्थांचा असावा असे आपण म्हणतो आणि हेच लक्षात ठेऊन मग त्यानुसार पदार्थ ठरवतो. पण एखाद्या वेळी या सगळ्या तत्त्वांना बाजूला ठेऊन जरा जास्त कॅलरीज असलेला, तेलकट असा एखादा पदार्थ आपण मुलांना ‘चीट डे’ म्हणून देऊ शकतो. अशा एखाद्या नवीन, अनोख्या पदार्थाने मुले नक्कीच खुश होतील. 


किसलेले पनीर
साहित्य : 
शेवया – अर्धी वाटी, बटाटा – दोन उकडलेले, चीज – एक क्यूब, पनीर - २५ ग्रॅम, आवडीच्या वाफवलेल्या भाज्या - पाव वाटी, ब्रेड असल्यास – एक स्लाइस, तेल – तळण्यासाठी, आले-मिरची व कोथिंबीर – आवडीप्रमाणे.


कृती : 
- सर्वप्रथम उकडलेला बटाटा व ब्रेड एकत्र कुस्करून घ्या.
- त्यात मिरची, कोथिंबीर, आले आणि वाफवलेल्या भाज्या घाला.
- चवीपुरते मीठ घालून, या मिश्रणाचे अलगद छोटे छोटे गोळे बनवा.
- या गोळ्यांची वाटी बनवून त्यामध्ये किसलेले पनीर व चीज भरा.
- आता गोळा नीट बंद करून परत छान गोलाकार करून घ्या.
- हा गोळा शेवयांमध्ये चांगला घोळून घ्या. 
- शेवया चिकटत नसल्यास अत्यंत पातळ मैद्याची पेस्ट करून हा गोळा त्यात बुडवा व लगेच शेवयांवर रोल करा म्हणजे त्या चिकटतील.
- आता हे गोळे गरम तेलात तळून घ्या. 
- डब्यात भरताना गोल मधोमध कापा म्हणजे ते पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणे दिसू लागेल.
- हा पदार्थ हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा. 
              
- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZYUBH
Similar Posts
डाळ साबुदाणा एक स्वादिष्ट घटक आणि स्टार्चचे गुणधर्म असलेल्या साबुदाण्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. आपल्याकडे केवळ उपवासाचा पदार्थ म्हणून खाल्ला जाणारा हा साबुदाणा इतर वेळेस फार खाण्यात येत नाही. म्हणूनच यावेळेस ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात आपण पाहणार आहोत डाळ साबुदाणा...
मिश्र डाळींच्या साटोऱ्या रोजच्या जेवणात तूरडाळ आणि मूगडाळ सोडली तर इतर डाळींचा उपयोग फारसा केला जात नाही. त्यात डाळी पचायला जड असल्याचा समज असल्यामुळे बहुतांश लोक डाळींचे पदार्थ कमीच खातात; पण डाळींचे अनेक चांगले गुण आहेत. वाढत्या वयात शरीराला प्रथिनांची गरज असते. त्यामुळे आहारात डाळी व कडधान्ये असणे गरजेचे आहे. म्हणूनच या वेळी
डाळींचा चिवडा चिवडा हा मुलांचा आवडता पदार्थ. सण-वार काळात तर घरात हमखास चिवडा असतो. मुलांचा हा आवडता पदार्थ आणखी वेगळ्या पद्धतीने चविष्ट आणि पौष्टिक बनवता आला तर..? यासाठीच आपण ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळेस पाहणार आहोत डाळींचा चिवडा...
मिश्र डाळींचे वडे हिवाळ्याच्या दिवसांत वेगवेगळ्या डाळी आणि विशेषतः कडधान्ये खाण्यावर भर दिला पाहिजे, असं डॉक्टर सांगतात. याने शरीराचे उत्तम पोषण होते. मुलांना डब्यातही मग असेच काही चविष्ट आणि पौष्टिक देता आले तर..? यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत मिश्र डाळींचे वडे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language